विहीर अधिगृहीत मोबदल्यात राज्य शासनाकडून वाढ

पुणे – राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बोअरवेल, विहीर, जलाशये अधिगृहीत केले जात आहेत. ही खासगी पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केल्यास संबंधीत मालकांना मिळणाऱ्या मोबदल्यात शासनाने वाढ केली आहे.

पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहण मोबदल्याच्या दराची कमाल मर्यादा राज्य शासनाने 2012 मध्ये निश्‍चित केली आहे. खासगी विहीर अधिग्रहीत केल्यानंतर मालकाने पाणी उपसण्यासाठी विद्युत, डिझेल पंप किंवा विद्युत कनेक्‍शनसह साधनसामग्री उपलब्ध न करून दिल्यास 450 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी हे दर 300 रुपये एवढी रक्‍कम होती. जर सर्व साहित्य उपलब्ध करून दिल्यास 600 रुपये प्रतिदिन संबंधीत मालकांना मिळणार आहेत. यापूर्वी हा दर 400 रुपये एवढा होता. ही रक्‍कम दर तीन महिन्यांना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत वाटप केली जाणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)