विहिरीत बुडणाऱ्या महिलेला जीवदान

कोंढवा खुर्द अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 मिनिटांत काढले बाहेर

वानवडी – महंमदवाडी येथील शेतातील सुमारे 50 फूट खोल विहरीमध्ये पडलेल्या महिलेला अग्निशामक दलाच्या जवानांनी 10 मिनिटात सुखरूप बाहेर काढले. गंगा बबन राऊत (वय-50) असे या महिलेचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील गल्ली क्रमांक 16 येथे शेतात असणाऱ्या खोल विहरीमध्ये गंगा राऊत या महिला पडल्याचे स्थानिक नागरिकांनी 101 ध्वनी क्रमांकावर माहिती अग्निशमन केंद्राला कळविली. तातडीने कोंढवा खुर्द अग्निशामन केंद्रामध्ये याची माहिती मिळताच कोंढवा खुर्द अग्निशन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. या घटनेची पाहणी केली असता. विहिरीतील महिला पाण्यात बुडत होती. जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच स्टेप लॅंडर विहरीमध्ये सोडले. या महिलेचे वजन जास्त असल्यामुळे स्टेप लॅंडरनी वर काढण्यास अडचण निर्माण होत होती. दलाचे जवान सुभाष खाडे यांनी सेफ्टी बेल्ट घेऊन विहिरीमध्ये उतरले. या महिलेला सेफ्टी बेल्ट घालून व कंबरेला एक सेफ्टी रस्सी बांधुन स्टेप लॅंडरच्या साह्याने दलाच्या जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुखरूपपणे विहरीतून बाहेर काढून कुटुंबाच्या ताब्यात दिले. यामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दलाचे जवान ड्रायव्हर चव्हाण, फायरमन रवी बारटक्के, सुभाष खाडे, आर्यन जवान टिळेकर, ठाकरे यांनी कामगिरी पार पाडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)