विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

file photo

अकोले – चास (ता.अकोले) येथे एक वर्ष वयाच्या बिबट्या मादी बछड्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भक्षाचा पाठलाग करताना ही घटना घडली असण्याची शक्‍यता वन विभागाने व्यक्त केली. याबाबत अधिक माहिती अशी की, चासच्या आनंदवाडी शिवारामध्ये काल सायंकाळी सुदाम दगडू शेळके यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये काही मुलांना पाण्यात बिबट्याचे बछडे तरंगताना आढळून आले. सदरील घटना त्या मुलांनी दूरध्वनीवरून सरपंच बाळासाहेब शेळके यांना सांगितली. त्यांनी तत्काळ वनाविभागाशी संपर्क साधून माहिती दिली.

अकोल्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले, वनपाल दिलीप गोसावी, वनरक्षक आर.एन.घोडसरे, वनरक्षक डी. बी.कोरडे यांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट दिली व पंचनामा केला. टोमॅटो क्‍यारेटच्या जाळीला दोरी बांधून विहिरीतून बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढले.यावेळी बघ्यांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. त्यानंतर वनविभाकडून त्या बछड्याला सुगावच्या नर्सरीमध्ये नेण्यात आले. आज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येवले यांनी त्या बछड्या मादीचे शवविच्छेदन केले. सुगावच्या नर्सरीमध्ये त्या बछड्याचे दहन करण्यात आले असल्याची माहिती वनपाल गोसावी यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)