विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

अणे-येथील दत्तनगर येथील मळ्यातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे दिसत असल्याची माहिती बेल्हे विभागाचे वनपाल डी. डी. फापाळे यांना मिळाली असता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ही विहीर रामदास चाटे व घोडके यांची सामाईक आहे. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. रामदास चाटे व घोडके यांच्या सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार सुरू करण्यापूर्वी सुरेखा पोपट चाटे यांनी सहज विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या विहिरीच्या पाण्यावर तरंगत असलेला दिसला. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके यांच्याकडून मिळताच सुमारे 60 फूट खोल असलेल्या विहिरीतून बिबट्या काढण्यासाठी केतन शांताराम मटाले यांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरुन मृत बिबट्याच्या कमरेला दोरीने बांधून दत्तनगर व मटालेमळा ग्रामस्थांच्या सहकार्याने वर काढले. मृत बिबट्या चार वर्षे वयाची पूर्ण वाढ झालेली मादी असल्याचे दिसून आले. अंधारात सावजाच्या मागे धावताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्‍त केला. बेल्हे पशुवैद्यकीय अधिकारी शिवकुमार पाटील यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. यावेळी दत्तनगर, मटाले मळ्यातील पांडुरंग पिंगट, विनोद पिंगट, देविदास पिंगट, विजय चाटे, सीताराम नायकोडी, पोपट चाटे या स्थानिक तरुणांनी सहकार्य केल्याचे वनपाल डी. डी. फापाळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)