विहिरीत पडलेल्या श्‍वानाला जीवनदान

– अग्निशमन दलाने काढले सुखरुप बाहेर

पिंपरी – चिखलीतील जाधववाडी परिसरातील वडाची विहीर येथे कुत्र्यांच्या भांडणात एक कुत्रा विहिरीमध्ये पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी धाव घेत त्याची सुखरूप सुटका केली.

याबाबतची हकीकत अशी की, विहिरीजवळ झालेल्या कुत्र्याच्या भांडणात एक कुत्रा विहिरीत पडला. तो जखमी अवस्थेत होता. तीन दिवसांपासून अन्नाशिवाय तो कुत्रा विहिरीत होता. महेंद्र मंडलिक यांनी अग्निशमन विभागाला ही माहिती दिली. चिखली अग्निशमन विभागाचे जवान भरत फाळके, बालाजी वैद्य, सुनील फरांदे, दिलीप कांबळे, रुपेश जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विहिरीची पाहणी करून अत्यंत शिताफीने कुत्र्याला कुठलीही इजा न पोहोचवता विहिरीतून बाहेर काढले.

सुरुवातीला कुत्र्याने जवानांना चावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपण विहिरीतून सुरक्षित बाहेर पडत आहोत, अशी खात्री होताच त्याने काहीही केले नाही. शेवटी विहिरीतून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्यांच्याभोवती घुटमळत, शेपटी हलवत अग्निशमन विभागाविषयी त्याने कृतज्ञता व्यक्त केली. कुत्रा हा जीव लावणाऱ्यांप्रति इमानदार असतो हे आजवर ऐकले असेल, मात्र चिखली अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याठिकाणी जमलेल्या बघ्यांनीही टाळ्या वाजवून अग्निशमन दल आणि कुत्र्याच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)