विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला काढले बाहेर

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथील शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले. मंगळवारी पहाटे कोल्हा विहिरीत पडल्याचा अंदाज मारुती बाबूराव पठारे यांनी व्यक्त केला.
मंचर-शिरुर रस्त्यालगत अवसरी खुर्द-वायाळमळा येथे मारुती पठारे यांच्या मालकीची विहीर आहे. विहिरीच्या शेजारी ऊसाची शेती आहे. मंगळवारी (दि. 30) दुपारी 2 वाजता शेतकरी पवन विठ्ठल पगारे उसाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील कृषिपंप चालु करण्यासाठी गेले असता पंप सुरू झाला नाही. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता पगारे यांना कोल्हा पडलेला दिसला. त्यांनी माजी उपसरपंच प्रमोद शेलार यांना याची माहिती दिली. त्यानुसार शेतकऱ्यांनी वनखात्याच्या सहकार्याने कोल्ह्याला विहिरीबाहेर सुरक्षित बाहेर काढले. शेतकरी अशोक सोनवणे, अभिजित वायाळ, दत्तात्रय वायाळ यांनी कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)