विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

मंचर – जाधवमळा-मंचर (ता. आंबेगाव) येथील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. मंचर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.
प्रशांत कांतीलाल जाधव (वय 35) असे या मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 10) दुपारी राणी बाबाजी जाधव यांना सीताराम महादु जाधव यांच्या शेतातील विहिरीत प्रशांत जाधव यांचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी याची माहिती पराग बाबाजी जाधव यांना दिली. पराग जाधव यांनी त्वरित याची माहिती मंचर पोलिसांना दिली. यानंतर प्रशांत जाधव यांना रूग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता डॉक्‍टरांनी मृत म्हणून घोषित केले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस ए. व्ही. भोसले यांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस नवनाथ नाईकडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)