विस्थापित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

आ. मुरकुटेंच्या विरोधात घोषणा

नेवासे – तालुक्‍यातील पांढरीपूल औद्योगिक वसाहतीसाठी जमीनी देणाऱ्या विस्थापित शेतकऱ्यांना शासनाने जमिनी आधिग्रहण करतांना दिलेल्या आश्वासनपूर्ती करावी, या मागणीसाठी मंगळवार (दि. 2) रोजी नेवासे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, याप्रश्नी आमदार बाळासाहेब मुरकुटेंवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करून संतप्त आंदोलकांनी आमदार मुरकुटे नातलगांसह तुपाशी, भूमिपुत्र मात्र उपाशी असा आरोप करत घोषणा दिल्या.
सामाजिक कार्येकर्ते पांडुरंग होंडे, रामभाऊ पुंड, संतोष पुंड यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित गावांतील शेतकरी नेवासे तहसील कार्यालयासमोर संपादित जमिनींना एकरी 50 लाख रुपये भरपाई मिळाली पाहिजे, विस्थापित शेतकऱ्यांना वसाहतीतीत व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, कुटुंबियातील एका सदस्याला कंपनीत कायम स्वरूपी नोकरीत घ्यावे आदी मागण्यासाठी उपोषणास बसले आहेत.
याबाबत माहिती देताना पांडुरंग होंडे म्हणाले, औद्योगिक वसाहतीतील सोयी-सुविधा तसेच अडचणींसंदर्भात भेटण्यास गेलेल्या उद्योजकांना लोकप्रतिनिधींनी स्थानिक शेतकऱ्यांची भीती घालून विविध कारखान्यांची कामे नातेवाईकांना मिळवून दिली. नेवासे तालुक्‍यातील पांढरीपूल एमआयडीसीसाठी शिगंवेतुकाई, लोहगांव, वाघवाडी, झापवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना संबंधितांकडून त्यांना वसाहतीत स्वतंत्र राखीव जागा, योग्य मोबदल्यासह येथील कंपन्यांमध्ये विस्थापित शेतकऱ्यांच्या मुलांसह स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्यक्रम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पुर्ण केले नाही.

-Ads-

आ. मुरकुटेंनी नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या – शिवनाथ होंडे
ऐन तारुण्यात होती नव्हती तेवढी सुपीक जमीन औद्योगिक वसाहतीसाठी दिली. वाटलं नुकसान भरपाईसह परिसरातील आपल्यासारख्या असंख्य तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल. पण तेव्हापासून आमच्या नशिबाला लागलेले हे ग्रहण अजूनही सुटलेले नाही.

राजकीय भामटेगीरीचे बळी : बाळासाहेब ससे
आम्ही लोकप्रतिनिधींना आमचा हक्क मिळवून द्या, म्हणून साकडे घातले तर त्यांनी आमच्या निवेदनाचा धाक दाखवून उद्योजकांवर दडपण आणले. स्वतःच्या नातेवाईकांची दुकानदारी भक्कम केली. आमच्या कुटुंबाची सर्वात जास्त जमीन औदयोगिक वसाहतीसाठी देऊनही आमच्यावर देशोधडीला लागण्याची वेळ आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)