विस्थापितांसाठीच्या सल्लागार मंडळाचे काश्‍मीरी पंडितांकडून स्वागत

जम्मू,- सरकारने जम्मू काश्‍मीरातून विस्थपित झालेल्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्याचे जम्मू काश्‍मीारातील ऑल मायग्रंट कोऑर्डिनेशन कमिटीने स्वागत केले आहे. काश्‍मीरी पंडितांसाठी तसेच अन्य विस्थापितांसाठीही असे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा इरादा असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नुकतीच दिली होती. ही आमची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे असे या समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पकिस्तान व्याप्त कामीर, चंबा, आणि पश्‍चिम पाकिस्तान तसेच काश्‍मीर खोऱ्यातून विस्थपित झालेले काश्‍मीरी पंडित यांच्यासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. ही एक चांगली सुरूवात आहे असे ऑल पार्टी मायग्रंट कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष विनोद पंडित यांनी सांगितले. या प्रस्तावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सरकारने सर्व संबंधीतांना विश्‍वासात घ्यावे अशी सुचनाहीं त्यांनी केली. आम्ही सन 2005 सालापासून सरकारकडे ही मागणी करीत आहोत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)