विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी संघटित प्रयत्न आवश्‍यक

ना. माधव भंडारी यांचे प्रतिपादन

सातारा,दि.4 प्रतिनिधी- राज्यातील प्रकल्प विस्थापिंताचे पुनर्वसन हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय असून सकारात्मक विचाराने हा प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील खाणी, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प, वीज प्रकल्प व जलसंपदा विभागातील प्रकल्पग्रस्तांना जनजागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यात येईल,असे आश्‍वासन राज्य पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले.

जनजागर प्रतिष्ठानच्यावतीने पुणे येथे आयोजित वार्षिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ.बुधाजीराव मुळीक, सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, जलतज्ञ विजय परांजपे आदी.उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांनो एक व्हा, असे आवाहन करून शोषित प्रकल्पग्रस्तांचा संपर्क वाढविण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी राज्य समन्वयक माधव कुलकर्णी, सहराज्य समन्वयक देवराज देशमुख, सातारा जिल्हा समन्वयक अमित कदम, रामचंद्र विरकर, शेजलताई कदम, आदींनी मनोगत व्यक्त केले. संतोष दिघे यांनी प्रास्ताविक केले तर आभार श्रीहरी गोळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)