विस्तारीत इमारत प्रवेशाला अखेर मुहुर्त

17 जानेवारीला महापौरांसह सत्ताधारी पदाधिकारी करणार प्रवेश

पुणे – महापालिकेच्या विस्तारीत इमारतीत अखेर पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची तारीख निश्‍चित झाली आहे. पुढील आठवड्यात 17 जानेवारीस महापौरांसह सत्ताधारी भाजपचे सर्व पदाधिकारी नवीन कार्यालय वापरण्यास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, अद्याप काही राजकीय पक्षांची जागा वाटपावरून नाराजी कायम असल्याने या जागांवरून वाद होण्याचीही शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून सुमारे 50 कोटी रुपये खर्चून विस्तारीत इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमधील सभागृहाचे उद्‌घाटन 21 जून 2017 रोजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर पुढील महिन्याभरात विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण होऊन सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये तसेच नगरसचिव विभाग या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर सात महिने झाले तरी या इमारतीमधील केवळ मुख्यसभेचे सभागृहच वापरले जात आहे. तर, या इमारतीत राजकीय पक्षांना द्यायची जागा निश्‍चित होत नसल्याने कोणतेही कार्यालय अद्यापही स्थलांतरीत करण्यात आलेले नव्हते. मात्र, सत्ताधारी भाजपने आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख राजकीय पक्षांना कार्यालयांच्या जागा दिल्या आहेत. त्यानंतरही अद्याप काही राजकीय पक्षांमध्ये नाराजी असली तरी, भाजपने आपली कार्यालये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदाधिकाऱ्यांच्या जुन्या दालनातील साहित्य हलविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जुन्या इमारतीमध्ये स्मार्ट सिटीचे कार्यालय
जुन्या इमारतीमधील रिकाम्या होणाऱ्या कार्यालयांची जागा स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून विचार सुरू आहे. त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. सध्या महापालिकेचे काही विभाग शहरात इतरत्र बसत आहेत. त्यांनाही प्रशासकीय सोयीच्या अनुषंगाने महापालिकेत आणण्यासाठी ही कार्यालये देता येतील का आणि स्मार्ट सिटीचे कार्यालय सावरकर भवन येथे स्थलांतरीत करता येतील का या पर्यायांचाही विचार सुरू असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)