विस्तारा एअरलाइन्सच्या हवाई सुंदरीची छेड

नवी दिल्ली : विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात एका हवाई सुंदरीशी छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. महिला क्रू मेंबर्सने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 24 मार्च रोजी एअर विस्तारा कंपनीचे विमान लखनऊहून दिल्लीला जात असताना आरोपी प्रवाशाने या हवाई सुंदरीला वाईट हेतूने स्पर्श केला. या प्रकरणात हवाई सुंदरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

विशेष म्हणजे या हवाई सुंदरीची छेड चक्क एका 62 वर्षीय पुणेकर आजोबांनी काढली आहे. हे आजोबा पेशाने व्यावसायिक आहेत. विमान जमिनीवर उतरल्यानंतर या आजोबांनी हवाई सुंदरीची छेड काढली, या आरोपाखाली 62 वर्षीय आजोबांना अटक करण्यात आली. या प्रकारानंतर विस्तारा एअरलाइन्सनं एक बैठकही घेतली असून, या पुणेकर आजोबांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या कर्मचा-यांशी चुकीचं वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांवर 30 दिवसांसाठी विमान प्रवासाची बंद घालण्यात येत असल्याची माहिती विस्तारा एअरलाइन्सनं दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)