विस्कळीत पाणी पुरवठ्यामागे राष्ट्रवादी?

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारितील शहरातील विविध ठिकाणचे पंप हाऊस चालविण्यासाठी एक कोटी 82 लाख पाच हजार 275 रुपयांच्या तीन ठेक्‍यांना स्थायीने मंजुरी दिली आहे. मेसर्स शुभम उद्योग या एजन्सीला हा ठेका पुन्हा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तीनही ठेक्‍यासाठी प्रत्येकी तीन ठेकेदार संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामागे राष्ट्रवादीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यावरून चांगलेच राजकारण पेटले असून, आढावा बैठकीत सत्ताधारी भाजपचे नगरसेवकांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू तरळले होते. यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर राहुल जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी निकराचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही पाणी प्रश्‍नाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नाही. शहराला पाणी पुरवठा करणारे धरण पूर्ण क्षमतेने भरूनही शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांमुळे नगरसेवकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत माहिती घेतली असता, राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या मेसर्स शुभम उद्योग या ठेकेदार संस्थेकडे शहराला पाणी पुरवठा करणारे विविध पंप हाऊस चालनाची जबाबदारी होती. या ठेक्‍याची मुदत संपत आल्याने 25 सप्टेंबरला झालेल्या स्थायीच्या साप्ताहिक बैठकीत याच ठेकेदार संस्थेला ठेका देण्याच्या एक कोटी, 82 लाख पाच हजार 275 रुपयांच्या खर्चाच्या तीन ठेक्‍यांना मंजुरी देण्यात आली आहे. या ठेक्‍यामध्ये रहाटणी, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली, बोपखेल, कृष्णानगर, पाटीलनगर, जाधववाडी, गवळीमाथा, सांगवी, सांगवी गावठाण, पिंपळे गुरव आणि दापोडी या पंप हाऊसचा समावेश आहे.

-Ads-

एकाकडेच विविध कामांचा ठेका
शहराच्या विविध भागांमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने, नागरिक थेट नगरसेवकांना याचा जाब विचारत आहेत. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा रोष दिवसें-दिवस वाढत आहे. भाजपविरोधात जनमत जावे, याकरिता राष्ट्रवादीच्या या नेत्याशी संबंधित कंत्राटी कामगारांकडूनच पाणी पुरवठा विस्कळीत केला जात असल्याची शंका घेण्यास वाव आहे. यापूर्वी कचऱ्याची समस्या देखील अशाप्रकारे जटील झाली आहे. अद्यापही तो प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. शहरातील पंप हाऊसमध्ये मजूर पुरविण्याबरोबरच कचऱ्याची वाहतूक, सुरक्षा रक्षकांची नेमणूक अशा अनेक कामांमध्ये या नेत्याशी संबंधित संस्थेचा ठेका आहे. भाजपच्या काळात देखील या ठेकेदार संस्थेने निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन, अनेक कामांचे ठेके मिळविले आहेत. मात्र, कामातील हलगर्जीपणामुळे या ठेकेदार संस्थेवर अद्यापपर्यंत कोणती कारवाई झाली आहे की नाही, याची माहिती समजू शकली नाही.

याबाबत भाजप शहराध्यक्ष लक्षमण जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, या निविदांबाबत मला माहिती नसून, या निविदांची माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे म्हणाले. तर सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, पाणी ही मुलभूत सुविधा असून, नागरिकांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कोणी कामचुकारपणा करत असेल, तर त्याची शहानिशा करुन प्रसंग तो ठेका रद्द करू. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही त्यांची फोन न उचलल्याने त्यांची याबातची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)