विसापूरवरील पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी मावळे सरसावले

विसापूर : येथील गडावरील पाण्याच्या टाकीतील गाळ काढताना मंचचे कार्यकर्ते.

पवनानगर – लोहगड विसापूर विकास मंचातर्फे लोहगड व विसापूर किल्ल्यावर गेली 18 वर्षे काम चालू आहे. विसापूर किल्ल्यावर मंचातर्फे स्वच्छता अभियान, शिवमंदिरासाठी पुरातत्त्व विभागाचा पाठपुरावा, गडावर जाण्यासाठी दिशादर्शक बोर्ड असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

दोन वर्षांपासून मंचातर्फे पाण्याच्या टाकीचा गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेतला. विसापूरवर अनेक टाक्‍या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात गडावरील पाण्याचा साठा कमी होत आहे. पर्यटकांना पाणी मिळत नाही. त्यासाठी मंचाने आता गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या शिवप्रेमींना, पर्यटकांना पिण्यास पाणी मिळावे. तसेच वन्यजीवांना पाणी मिळावे हा त्यामागील हेतू आहे.

-Ads-

उन्हामध्ये शरिराची लाही लाही होत असताना मंचाचे सर्व कार्यकर्ते उन्हामध्ये सुट्टीच्या चारही रविवारी गडावर जाऊन काम करत आहे. एका टाकीचा गाळ काढून झाल्यावर दुसऱ्या टाकीचा गाळ काढण्यात येईल, असे मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले. तसेच 3 जून रोजी रविवारी सकाळी गाळ काढण्याचे काम मंचाचे कार्यकर्ते करणार आहे. गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन अध्यक्ष संदीप गाडे, विश्‍वास दौंडकर, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, संदीप भालेकर, राहुल वाघमारे, चेतन नाटक, अरुण काकडे, अनिकेत आंबेकर,विठ्ठल करे यांनी केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)