विसर्जन घाटांची स्वच्छता सुरू

पिंपळे सौदागर – गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना अद्याप गणेश विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आली नव्हती. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सदर बाबीची दखल घेत तातडीने पालिका आरोग्य विभागास संपर्क साधून देवी आई माता व दत्त मंदिर घाट, नदी पात्र परिसर तसेच बाकी सर्व घाटांची साफ-सफाई करण्याची सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यानंतर देवी आई माता व दत्त मंदिर घाट व नदीपात्र परिसर साफ सफाईच्या कामास पालिका आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे.
गणेशोत्सवात गणेशभक्त गणपती बाप्पाचे थाटात स्वागत करतात. कोणी दीड दिवस, कोणी पाच दिवस तर कोणी दहा दिवसांनी आपल्या लाडक्‍या बाप्पांना निरोप देतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. हे पाहता विसर्जन घाटाची स्वच्छता अत्यावश्‍यक असल्याचे लक्षात घेऊन नगरसेवकांनी सूचना देऊन विसर्जन घाटाची स्वच्छता करुन घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)