विसर्जनाच्या निर्णयामुळे विघ्नसंतोषी लोकांना चपराक

खा.उदयनराजे भोसले यांचा चमको कार्यकर्त्यांना टोला

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी)- सातारा-यात श्री गणेशाचे आगमनापेक्षा, विसर्जनाचीच अधिक चर्चा यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर काही उलटया काळजाच्या विघ्नसंतोषी व्यक्‍तींकडून जाणिवपूर्वक होत होती. परंतु मा.उच्य न्यायालयाने, आजच मंगळवारतळे येथे विसर्जनास परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय दिल्याने, विसर्जन प्रश्‍नाचा भयानक बागुलबुवा उभा करणारेच स्वतः तोंडावर पडून, त्यांचे दात घशात गेले आहेत. मा.उच्य न्यायालायाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशी मार्मिक प्रतिक्रीया सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

विसर्जनाच्या प्रश्‍नाविषयी पालिकेला गांभिर्य नाही, आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न खासदारांकडून होत आहे. विसर्जनास मंगळवारतळे उपलब्ध झाले नाही तर गणेश भक्‍तांच्या रोष ओढावेल., अश्‍या प्रकारचे बेताल वक्‍तव्य करुन, आमच्यावर आणि साविआवर अकारण तोंडसुख घेण्याचा प्रकार काही व्यक्‍तीकडून जाणुन बुजुन सुरु होता असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, तळयांमधील विसर्जनाकरीता काही व्यक्‍तींचा विरोध होता. सदरचा विरोध विसर्जनानंतर तळयांची योग्य प्रकारे आणि वेळच्यावेळी स्वच्छता होत नाही या कारणाकरीता होता. परंपरा मोडीत काढण्याचा इरादा त्यामध्ये नव्हता. त्यांचा विरोध रास्तही होता. त्याचवेळी सन 2015 साली मा.उच्यन्यायालयात एक याचिका दाखल झाली. त्यावेळी नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी यांचेवर दबाब टाकून, कृत्रिम तळे काढणे आणि मुजवणे यामध्ये ज्यांचा इंन्ट्रेस्ट होता अश्‍या नविआच्या तत्कालीन दोन चमको नगरसेवकांनी, नगरपरिषदेच्या सभेची मंजूरी घेतल्याशिवाय मे.उच्य न्यायालयात, नगरपालिका मोती तळे येथे विसर्जन होवू देणार नाही असे प्रतिज्ञापत्र मुख्याधिकारी यांना सादर करायला भाग पाडले. प्रतिज्ञापत्र दिल्याने ना.उच्य न्यायालयाने, जनहित याचिका खारिज केली. सभेच्या मंजूरी शिवाय प्रतिज्ञापत्र करायला ज्यांनी भाग पाडले त्यांच्या त्यावेळच्या भुमिकेचे समर्थांनफक्‍त उलटया काळजाची व्यक्‍तीच करु शकते. तथापि त्यामुळे गणेश भक्‍त प्रचंड नाराज झाले.गणेश विसर्जनाची कित्येक वर्षांची परंपरा मोडीत निघण्याबरोबरच, नगरपरिषदेवर कृत्रिम तळे खोदणे आणि ते मुजवण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागला.

इतक्‍यावरच ते थांबले नाहीत तर, यंदाच्या जि.प.ची सुत्रे आहेत अश्‍यांकडून कृत्रिम तळे उभारलेल्या जिल्हापरिषदेच्या जागेभोवती मोठी भिंत बांधण्याचे काम सुरु केले गेले. त्यामुळे ती जागा नगरपरिषदेला परत उपलब्ध होण्याची शक्‍यता संपुष्टात आली. रिसालदार तलावाचा पर्याय आम्ही सुचवला, पोलिस प्रमुखांबरोबर पहाणी केली. प्रथम हरकत नसल्याचे म्हणणे पोलिसांनी दिले, नंतर मात्र कुणाच्या तरी दबावाखाली पुन्हा नकार देत घुमजाव केले. अश्‍या प्रकारे सर्व बाजुंनी नगरपालिकेत केवळ साविआची सत्ता आहे म्हणून आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला.
यापार्श्‍वभुमीवर आज मंगळवारतळयामध्ये विसर्जनास प्रतिबंध करु शकत नाही, अश्‍या आशयाचा, मा.उच्य न्यायालयाने दिलेला निर्णय म्हणूनच अत्यंत स्वागतार्ह आहे. उलटया काळजाच्या व्यक्‍तींना जबरदस्त चपराक देणारा हा निर्णय आहे.साविआची कोंडी करणा-या धेंडांचे दाढांसकट दात त्यांच्याच घश्‍यात गेले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व सातारकर नागरीकांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत, मंगळवारतळयामध्ये मुर्ती विसर्जनास आम्ही याआधीच परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना, विसर्जन झाल्यानंतर, शक्‍य तितक्‍या लवकर मंगळवारतळयाची स्वच्छता करावी अशी अट आम्ही नगरपरिषदेस घातली आहे. त्यामुळे नगरपालिका मंगळवारतळयाची स्वच्छता वेळचे वेळी करेल असेही खा. उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)