विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू

पिंपरी – विष प्राशन करुन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रावेत येथे घडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 22) रात्री उघडकीस आला. मात्र हा घातपात आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अमोल रविंद्र शितोळे (वय-30, रा. कासारसाई), अनुपमा नवनाथ कारंडे (वय-41, रा. वाकड) अशी मयत दोघांची नावे आहेत.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेतजवळ एका मोटारीत एक महिला व एक पुरुष असे दोघे बुशुद्ध अवस्थेत अढळले होते. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अनुपमा यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर अमोल याचा उपचारा दरम्यान रात्री उशीरा मृत्यू झाला.

या दोघांनी विष घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. अमोल हा खासगी कंपनीत भूमापणाचे काम करत होता तर अनुपमा या गृहिणी होत्या. मात्र त्यांच्या मृत्यूमागचे गुढ अद्याप उलगडले नसून पोलिसांकडे अद्याप कोणी तक्रार दिलेली नाही. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून देहुरोड पोलीस याचा पुढील तपास करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)