विष्णुपंत महाडिक यांचे निधन 

कोल्हापूर – माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे ज्येष्ठ बंधू आणि खासदार धनंजय महाडिक यांचे चुलते विष्णुपंत महाडिक यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच वयवर्षे 80 होते. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील धुरंधर, प्रगतशील शेतकरी आणि नामवंत पैलवान म्हणून ते परिचित होते. पंढरपूर तालुक्‍यातील मोहोळ इथल्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक होते.

भीमा साखर कारखान्याच्या उभारणीत त्याचे मोलाचे योगदान होते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाडिक कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि भीमा कारखाना कुटुंबातील आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले जायचे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
9 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)