विषय समिती सदस्यांचा शुक्रवारी होणार फैसला

पिंपरी – महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत आहे. त्याजागी नवीन सदस्यांची निवड शुक्रवारी (दि. 20) होणाऱ्या सभेत केली जाणार आहे. सर्व समित्यांवर भाजपचेच वर्चस्व असल्याने सभापतीपदी वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांमध्ये मोठी रस्सीखेच आहे.

महापालिकेत महापौर, पक्षनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष ही महत्त्वाची पदे आहेत. त्यापाठोपाठ विधी समिती, क्रीडा-कला-साहित्य आणि सांस्कृतिक समिती, महिला आणि बालकल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती, जैव विविधता समिती अशा पाच प्रमुख समित्या आहेत.

-Ads-

विधी समिती सभापतीपदी शारदा सोनवणे, महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सुनीता तापकीर, कला-क्रीडा-समिती सभापतीपदी लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापतीपदी सागर गवळी, जैव विविधता समिती अध्यक्षपदी उषा मुंढे या आहेत. पाचही समिती सदस्यांची मुदत या महिन्या अखेरीला संपणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.

विधी समिती नऊ, जैवविविधता समितीत सात, महिला आणि बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा समितीत प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एक सदस्य प्रत्येक समितीवर जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)