विषय समिती निवडणुकीत भाजपचा वरचष्मा

  • वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या विषय समितीच्या निवड जाहीर

वडगाव – येथील वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्षा अर्चना संतोष म्हाळसकर यांची, तर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती दिलीप शंकर म्हाळसकर यांची निवड करण्यात आली. विषय समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहिल्याचे दिसून आले आहे.

येथील नगरपंचायत कार्यालयात पीठासीन अधिकारी मावळचे तहसीलदार रणजीत देसाई यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती आणि महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी (दि. 3) झाली. यामध्ये प्रत्येक जागेसाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. ती नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याने त्यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेचे वृत्तांत लेखन मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी केले.
महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सुनिता खंडू भिलारे, तर उपसभापती दीपाली शरद मोरे यांची निवड झाली.
क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समितीच्या सभापती पूजा विशाल वहिले, नियोजन व विकास समितीच्या सभापती प्रवीण सुरेश चव्हाण, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती सायली रुपेश म्हाळसकर आदींची निवड झाली.

-Ads-

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष मयूर प्रकाश ढोरे यांची, तर सदस्यपदी पूजा वहिले, दिलीप म्हाळसकर, सायली म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर आदींची निवड करण्यात आली.
विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवड झालेल्या नवनियुक्‍त सभापती, उपसभापती व सदस्यांचे तहसीलदार रणजीत देसाई, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, नगरसेवक दशरथ केंगले, दिनेश ढोरे, शारदा ढोरे, राहुल ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, प्रवीण चव्हाण, प्रमिला बाफना, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, राजेंद्र कुडे, सायली म्हाळसकर आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)