विश्‍व रक्तस्त्राव विरोध दिन

दरवर्षी 17 एप्रिल हा दिवस रक्तस्त्राव विरोध दिन (वर्ल्ड हिमोफोलिया डे) म्हणून साजरा केला जातो. विश्‍व रक्तस्त्राव संघ (वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफोलिया) हे या दिवसाचे प्रायोजक आहेत. जागतिक स्तरावर हा दिवस 1989 पासून साजरा केला जात आहे. 17 एप्रिलची निवड केली कारण हा होता फ्रॅंक स्चेनाबेल रक्तस्त्राव संघाचे संस्थापक यांचा जन्म दिवस.

हिमोफोलिया म्हणजे लहानशी जखम झालयावर खुप रक्तस्त्राव होण्याचा विकार. आपण रोजच अपघातातील जखमीचे रुग्णालयात नेताना निधन अशा प्रकारच्या बातम्या वाचत असतो. यात असा रक्तस्त्राव झाल्याने बरेच अपघातग्रस्त मृत्युमुखी पडतात. वेळीच जर प्रथमोपचार आणि रक्तस्त्राव थांबवता आला तर अनेकांचे प्राण वाचविता येतील. यासाठी लोकजागॄती, लोकशिक्षण आणि प्रथमोपचाराचे प्रशिक्षण यासाठी कटिबद्ध आहे विश्‍व रक्तस्त्राव संघ (वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफोलिया). या वर्षीचा 2018 च्या दिनाचा खास संदेश आहे, “ज्ञानातील सहभाग आपणास बलवान बनवतो’. त्यांचा आवाज ऐका (हिअर देअर व्हॉयसेस ) हा 2017 चा संदेश होता.

2016 चा संदेश होता ‘सर्वांसाठी उपचार’ ही सर्वांची विचारधारा सन 2015 चा संदेश होता “मदतनीसांची फौज उभारणे’ तर 2014 चा संदेश होता “बदलासाठी बोलते व्हा’ या आधी ही वेगवेगळे संदेशदिले आहेत.रक्तस्त्रावावर वेळीच उपचार हे हिमोफोलिया रुग्णांवरील उपचाराचे मुख्य सूत्र आहे. रक्तस्त्राव लवकर थांबविणे म्हणजे वेदनांपासून मुक्तता, शीघ्र सुधारणा आणि सांधे स्नायू आणि अवयवांना किमान कायमस्वरूपी इजा. यासाठी आवश्‍यकता आहे ती प्रथमोपचाराच्या प्रशिक्षणाची.

रक्तस्त्रावावरील प्रथमोपचाराचे प्रकार म्हणजे संपूर्ण विश्रांती, कमीतकमी हालचाल, रक्तस्त्राव थांबविण्यासाठी बर्फाचा उपयोग. रक्त वाहिनीवर दाब देऊन रक्तस्त्राव थांबविणे.जखमेचा भाग उंचावर करणे हे आहेत साधे प्रथमोपचारातील भाग जे रक्तस्त्राव थांबवून जखम भरण्यास मदत करु शकतात. यासाठी  आवश्‍यक आहे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण.

हा दिवस साजरा करण्यासाठी जगातील निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. आताच्या या गतिमान जीवनात प्रत्येकाने आपला परिचय, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आपला रक्तगट, असलेल्या व्याधी, मधुमेह, रक्तदाब इत्यादी माहिती जवळ बाळगल्यास आपतकालात उपचारासाठी ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्प करू की, घर सोडताना ही माहिती बरोबर ठेवायची. आताचे हे युग माहितीयुग आहे याचे भान ठेवूया.

विजय देवधर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)