तळेगाव दाभाडे – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे प्रमुख कार्यवाह विश्‍वास मधुकर देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबई शाखेचा 2018 चा डॉ. बरवे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला. 13 जून 2018 ते 15 जून 2018 या कालावधीत होणाऱ्या 98 व्या नाट्य संमेलनात 14 जून 2018 रोजी कालिदास रंग मंदिर मुलुंड मुंबई येथे होणाऱ्या समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

विश्‍वास देशपांडे हे केवळ नाट्य परिषदेचेच कार्यकर्ते नाहीत तर तळेगावातील कलापिनी, श्रीरंग कलानिकेतन, फ्रेंड्‌स ऑफ नेचर, सरस्वती शिक्षण संस्था या सर्वांचे कार्य निरलस पणे करीत असतात त्यांनी आपल्या कार्य पद्धतीने तळेगावच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे ते तळेगावातील जेष्ठ रंगकर्मी आहेत. गेली 38 वर्षे ते रंगभूमीच्या सेवेत आहेत. नेपथ्य आणि प्रकाश योजनेची अनेक पारितोषिके त्यांच्या नावावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)