विश्‍वासार्हता नसल्यामुळेच व्हिडीओ जारी करावा लागतो

सर्जिकल स्ट्राईकवरुण अरूण शौरी यांची पंतप्रधानांवर टीका
नवी दिल्ली – सध्याच्या सरकारची विश्वासार्हता कमी झाली आहे त्यामुळेच त्यांना सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ रिलिज करावा लागतो आहे असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरींनी खोचक शब्दात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकबाबत मला कधीही संशय नव्हता. भारतीय सैन्यदलाने शौर्य दाखवत ही कारवाई केली यात माझ्या मनात शंका नाही, मात्र माझी छाती छप्पन इंचांची आहे, पाकिस्तानाला आम्ही चोख प्रत्युत्तर दिले आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दावे फोल ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली.

बुधवारी काही वृत्तवाहिन्यांवरुन मोदी सरकारने 2016 मध्ये केलेल्या कथीत सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ प्रसारित केला होता. मात्र, या व्हिडिओबाबत कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी संशय उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना फक्त सर्जिकल स्ट्राईकच नाही तर पंतप्रधान मोदी सरकारच फेक आहे असा आरोप कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला होता. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील फसवणूक करणारेच आहेत असेही त्यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ 21 महिन्यांनी समोर आल्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्जिकल स्ट्राईकबाबत संशय व्यक्त केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ खरा – मनोहर पर्रीकर
सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ खरा असून त्याचा केवळ एक छोटासा भागच वृत्त वाहिन्यांनी दाखवला. मात्र, या यशस्वी कारवाईबद्दल आपल्याला लष्कराचे अभिनंदन करायला हवे. या सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित करुन कॉंग्रेस आपल्या सैन्य दलाच्या शूरतेचा अपमान करीत आहे. त्यामुळे त्यांनी अशी विरोधी भुमिका घेऊ नये. आपल्याकडे कणखर नेतृत्व असल्यानेच हे शक्‍य झाले, असे गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)