गुरगाव – विश्‍व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षपदी हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व्ही.एस. कोकजे यांची निवड करण्यात आली आहे. विश्‍व हिंदू परिषदेच्या पाच दशकांच्या इतिहासामध्ये प्रथमच झालेल्या संघटनात्मक निवडणूकीमध्ये ही निवड करण्यात आली. व्ही. एस. कोकजे यांना 131 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात निवडणूकीत उभे असलेल्या राघव रेड्डी यांना 60 मते मिळाली.

या निवडणूकीमध्ये विश्‍व हिंदू परिषदेच्या संघटनात्मक पातळीवरील 192 पदाधिकारी हे मतदार म्हणून पात्र होते. आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्‍ती करावी याबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होऊ न शकल्यामुळे प्रथमच निवडणूक घेण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)