विश्‍वशांती गुरुकुलाचे आज उद्‌घाटन

संग्रहित छायाचित्र

आळंदी- एमआयटी, पुणे संचालित विश्‍वशांती गुरुकुल सीबीएससी या राष्ट्रीय कीर्तीच्या शालेय शिक्षणसंस्थेच्या आळंदी शाखेचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. 22) दुपारी चार वाजता केळगाव-हनुमानवाडी, आळंदी (देवाची) येथे होणार आहे.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी प्रख्यात नाट्य- चित्रकर्मी डॉ. जब्बार पटेल, श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे देहूकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती कांबळे व खेड आळंदीचे आमदार सुरेश गोरे यांची सन्माननीय उपस्थिती राहील.

या उद्‌घाटनाच्या निमित्ताने प्रख्यात शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)