विश्‍वचषक स्पर्धेतून झिम्बाब्वे बाहेर 

गेल्या 36 वर्षांत प्रथमच नामुष्की 
नवी दिल्ली – झिम्बाब्वे संघ 36 वर्षांनंतर पहिल्यांदाच विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. पात्रता फेरीत संयुक्‍त अरब अमिरातीकडून (यूएई) 3 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यामुळे 1983 नंतर पहिल्यांदाच झिम्बाब्वेला विश्‍वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयश आले आहे.
इंग्लंड आणि वेल्समध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी झिम्बाब्वेला यूएईला पराभूत करणे आवश्‍यक होते. परंतु त्यांना 3 धावांनी पराभव पत्करावा लागला. आयसीसी विश्वचषक पात्रता फेरीतील सुपर सिक्‍समधील पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेला 40 षटकांत 230 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संघ 7 गडी गमावून 226 धावाच करू शकला.
त्याआधी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या यूएई संघाने खराब प्रारंभातून सावरत 47.5 षटकांत 235 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजा हा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत 41 धावा देत 3 गडी टिपले. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमनुसार झिम्बाब्वेला 40 षटकांत 230 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. झिम्बाब्वेची सुरुवातही निराशाजनक ठरली. पण नंतर सीन विल्यम्सने 80 धावा कुटल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या सिकंदर रजाने 34 धावा केल्या. मात्र उर्वरित फलंदाज वेगाने धावा जमवण्यात अपयशी ठरले आणि त्यांचा संघ अवघ्या 3 धावांनी पराभूत झाला.
अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आमच्याकडे अनेक संधी चालून आल्या होत्या. आमचा आतापर्यंतचा खेळ चांगला होता. परंतु, आजचा दिवस आमच्यासाठी निराशाजनक ठरला, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रॅमी क्रेमरने पराभवानंतर दिली. अंतिम फेरीत जाण्याचा आम्हाला विश्वास होता. मात्र आमचा पराभव झाला, असेही तो म्हणाला.
संक्षिप्त धावफलक – संयुक्‍त अरब अमिराती- 47.5 षटकांत सात बाद 235 (रमीझ शहझाद 59, गुलाम शब्बीर 40, सिकंदर रझा 41-3) विजयी विरुद्ध झिम्बाब्वे- (सुधारित लक्ष्य 40 षटकांत 230) 40 षटकांत सात बाद 226 (सीन विल्यम्स 80, पीटर मूर 39, मोहम्मद नावीद 40-3).

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)