विश्‍वचषक विजयाचे उद्देशानेच ऑस्ट्रेलिया भारतात – कोलिन बॅच

भुवनेश्‍वर: ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज असलेला गतविजेता ऑस्ट्रेलिया यंदाच्या हॉकी विश्‍वचषकात जेतेपद मिळवून हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने भारतात दाखल झाला आहे. असे झाल्यास 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत सरकारकडून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणे कायम राहील. त्यामुळे आम्ही विश्‍वचषक विजयाचे उद्देशानेच भारतात दाखल झालो आहोत असे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक कोलिन बॅचयांनी सांगितले आहे.

कोलिन बॅच यांच्यामते विश्‍वचषकात संघाची कामगिरी ढेपाळल्यास ऑलिम्पिकची तयारी प्रभावित होईल. अशावेळी सरकारकडून अतिरिक्त आर्थिक साहाय्य रोखले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आम्हाला या दौऱ्यात चांगली कामगिरी करावीच लागनार आहे. राष्ट्रीय संघाच्या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने हॉकीला 2020 पर्यंत अतिरिक्त आर्थिक साहाय्य देणे सुरू ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने 2010 आणि 2014 मध्ये विश्‍वचषक आणि यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे देखील सुवर्ण जिंकले आहे.

आज (शुक्रवारी) आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक बॅच म्हणाले, कामगिरी चांगली राहिली तरच आम्हाला आर्थिक पाठबळ सुरू राहील. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत सरकारकडून पाठबळ मिळत राहील, अशी आशा आहे. एखाद्या स्पर्धेत लवकर बाहेर पडलो तर त्याचा थेट प्रभाव पैसा मिळण्यावर पडतो. त्यामुळेच येथे चांगली कामगिरी करीत जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याचे आम्ही लक्ष्य आखले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)