विश्‍वचषक नेमबाजीत विवान कपूरला कांस्य

सिडनी – भारताचा षोडषवर्षीय नेमबाज विवान कपूरने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारांत कांस्यपदकाची निश्‍चिती करताना कुमार विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम राखली. तसेच त्याने अन्य दोन खेळाडूंच्या साथीत भारताला ट्रॅप प्रकारातील सांघिक कांस्यपदकही मिळवून दिले.

भारताच्या इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीची नोंद करताना सुवर्णपदक पटकावून भारताला सोनेरी प्रारंभ करून दिला होता. तिने सांघिक सुवर्णासह दुहेरी मुकुटाचीही कमाई केली होती. विवानने त्यात भर घालताना अंतिम फेरीतील 40 पैकी 30 लक्ष्यांचा वेध घेत भारताच्या खात्यात कांस्यपदकाची भर घातली.

विवानने प्राथमिक फेरीत 113 गुणांची नोंद करीत पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. विवानने 35पैकी 26 लक्ष्यांचा वेध घेत तैपेईच्या कुन पी यांगला मागे टाकले. अंतिम फेरीत इटलीच्या केवळ 18 वर्षे वयाच्या मॅटेव मारोंगुईने कारकिर्दीतील पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावले. त्याने त्याने ओयांग यिलियूचे आव्हान शूट-ऑफमध्ये मोडून काढले. सांघिक स्पर्धेत विवानने लक्षय (112) आणि अमन इलाही (103) यांच्या साथीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. दरम्यान 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ख्रिस्तोफर रमेशला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)