“विश्‍वकर्मा’ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

आळेफाटा- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील विश्वकर्मा सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास डावखर यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष हरीदास ताजवे यांच्या अध्यक्षतेखाली या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये मागील सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून करणे, तेरीज, नफा तोटा पत्रक मंजूर करणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा विभागणीस मंजुरी देणे, चालू वर्षाच्या उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे, लेखापरीक्षकाची नेमणूक करून मानधन ठरविणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना हरीदास ताजवे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी परीसरातील नवनिर्वाचित पदाधिकारी हरिदास ताजवे, तान्हाजी कुंजीर,बाबू पाटे,विठ्ठल गुंजाळ, वशाली गुंजाळ,सविता तिकोणे, बन्सी मटाले, लहु गुंजाळ, संजय जाधव, श्रावण जाधव दादासाहेब बहिरट यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुनील जाधव आणि विलास डावखर यांनी केले, तर आभार हरिदास ताजवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)