विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु कोकजे

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे माजी गव्हर्नर आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष असणार आहेत. गुरुग्राममध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वोटिंग झाली. कोकजे यांना 131 मतं मिळाली तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना 60 मतं मिळाली आहेत.

याआधी वोटर लिस्टबाबत प्रवीण तोगडिया यांनी गडबड झाल्याचा आरोप केला होता. वोटर लिस्टमध्ये 37 वोटर हे बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण वीएचपीचे महासचिव चंपत राय यांनी म्हटलं की, प्रवीण तोगडिया आणि व्हीएचपीचे अध्यक्ष राघव रेड्डी यांना अनेकदा मतदारांची यादी देण्यात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार राघव रेड्डी आणि प्रवीण तोगडिया गटाकडे कमी मतं होती त्यामुळे मागच्या वेळेप्रमाणे यंदाही गोंधळ घालून निवडणूक टाळण्याचा विचार होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)