विश्वेश्वर सहकारी बॅंकेची फुरसुंगी शाखा नव्या वास्तूत

पुणे, दि. 20- विश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या फुरसुंगी शाखेच्या नृतनीकृत वास्तूचे उदघाटन फुरसुंगी येथे बॅंकेचे अध्यक्ष सुनिल नामदेवराव रुकारी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी शंभू महादेव देवस्थान ट्रस्टला धार्मिक, सामाजिक कार्यासाठी य 5 लाख देणगी देण्यात आली.

त्यावेळेस बॅंकेचे उपाध्यक्ष गोविंद फ. कामठे, संचालक मंडळातील अन्य सदस्य श्री. अनिल भ. गाडवे, बापुसाहेब ना. धनकवडे, शरद ग. हापसे, राजेंद्र र. मिरजे, अमोल अ. मणियार, नंदकुमार व. होनराव, कल्पना श.गंजीवाले, सिमंतिनी कि.तोडकर, रत्नाकर मु.देवळे, मनोज व. साखरे व व उ.ए.ज. डॉ. चिंतामणी गो. वैजापूरकर तसेच फुरसुंगी गावातील मान्यवर व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चिंतामणी वैजापूरकर यांनी केले. संचालक गोविंद कामठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. फुरसुंगीतील ग्रामस्थांनी या विषयी समाधान व्यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)