विश्वचषक जिंकण्याची भारताला सुवर्ण संधी -जोजे ब्रासा

नवी दिल्ली: भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक जोजे ब्रासा हे भारतीय हॉकीच्या पुनराजीवनानाने प्रोत्साहित झाले असून या विश्वचषकात भारतीय हॉकी संघाला विजेतेपदाची सुवण संधी आहे असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय संघाने मायदेशात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या अभीयानाची सुरुवात 5-0 अश्‍या मोठ्या विजयाने केली होती. त्यामुळे प्रभावीत झालेले ब्रासा म्हणाले, यावेळचा विश्वचषक घरच्या प्रेक्षकांसमोर जिंकण्याची भारतीय संघाला मोठी संधी आहे.भारतीय संघाची मागील काही वर्षातील कामगिरी पाहता भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपदमिळवण्यास समर्थ आहे.

भारतीय संघ हा ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलॅंड आणि जर्मनी यांच्यासारख्या तगड्या संघात येतो. परंतु, भारतीय संघाला कामगिरीत सातत्य ठेवता आले पाहिजे. भारतीय संघ ज्याप्रमाणे कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे समर्थ ठेवतो त्याचप्रमाणे कोणत्याही संघाविरुद्ध भारतीय संघ सामना गमावू देखील शकतो. ब्रासा याने मे 2009 ते आशियाई खेळ 2010 पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)