विश्रांतवाडी येथे अतिक्रमण कारवाई

विश्रांतवाडी – येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या पथारी अतिक्रमण विभागाच्या वतीने नुकतीच विश्रांतवाडी चौक व आळंदी रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाईत 19 पथारी व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विश्रांतवाडी येथे झालेल्या कारवाईत आठ हातगाडी, एक स्टॉल व तब्बल 19 पथारी व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, विक्रेत्यांनी कारवाईस विरोध केला. मात्र विरोध डावलून अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई सुरूच राहिली. सदरची कारवाई सहाय्यक महापालिका आयुक्त विजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अतिक्रमण निरीक्षक डी. एस. ढोकळे, निरीक्षक अविनाश धरपळे यांच्यासह बिगारी कर्मचारी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)