विशेष राज्याची मागणी लावून धरणार : चंद्राबाबू नायडू

हैदराबाद : जोपर्यंत आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत लढत राहू, असा निर्धार आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी आता २ आणि ३ एप्रिलला दिल्ली येथे जाणार असल्याचे नायडू म्हणाले आहेत.

आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्य असा दर्जा मिळण्यासाठी नायडू यांनी मंगवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यात आंध्रप्रदेशातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, भाजप नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली. सुमारे ६ तास ही बैठक चालली.

तेलगु देसम पक्षाने केंद्र सरकारमधून काडीमोड घेतला. त्यानंतर रालोआ अर्थात भाजपप्रणीत आघाडीतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत आहेत. त्यात चंद्राबाबू नायडू यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. केंद्र सरकारने आंध्रला विशेष राज्याच्या दर्जाऐवजी पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता. यावर नाराज झालेल्या चंद्राबाबू नायडू यांनी मोठा निर्णय घेत आपली नाराजी जाहीर केली. दरम्यान, आता राज्याला विशेष दर्जा मिळावा यासाठी चंद्राबाबू यांनी ‘पॉलिटिकल डिप्लोमसी’चे आयोजन केले होते. पहिल्याच प्रयत्नात ही ‘पॉलिटिकल डिप्लोमसी’ यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)