विशेष राज्याचा दर्जासाठी आंध्र प्रदेशात बंद

अमरावती : आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी आज आंध्र प्रदेशात बंद पुकारण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या प्रत्येक होडा साधना समितीने हा बंद पुकारला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागात बंदचे पडसाद उमटले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले असून या बंदला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.

आंध्र प्रदेश प्रत्येक होडा साधना समितीचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. विरोधी पक्षातील वायएसआर काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. याआधी या मागणीसाठी तेलुगु देशम पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान निवासासमोर आंदोलन केले होते. तसेच वायएसआर काँग्रेस पार्टीच्या पाच खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी वायएसआर काँग्रेस आणि तेलुगु देशम पार्टीची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी टीडीपीनं भाजपसोबत असलेली युतीही तोडली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)