विशेष मुलांच्या आश्रमास मदतीचा हात

पिंपरी – चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सातारा येथील एहसास मतिमंद मुलांच्या आश्रमासाठी साखर, गहू, तांदूळ, मसुरडाळचे वाटप करण्यात आले.

दिवाळीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, सुनिता गायकवाड, नाशिक विभागाच्या महिला प्रमुख रुपाली जाधव, सातारा जिल्हा प्रमुख उमेश पवार, मिलन गायकवाड, ओमकार पवार, श्वेता गायकवाड आदी उपस्थित होते.

-Ads-

संस्कार प्रतिष्ठानकडून यंदाची दिवाळी वंचितांच्या मदतीसाठी साजरी करण्यात आली. यामध्ये गडचिरोली मधील आदिवासी बांधवांसह राज्यातील विविध ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये साहित्य व धान्य स्वरुपात मदत करण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)