विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी

सातारा -1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 30 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत विशेष मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये नवीन मतदारांची व मतदार नोंदणीपासून वंचित मतदारांची नोंदणी होण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि. 7, 14, 21 आणि 28 ऑक्‍टोबर या चार दिवशी मतदान केंद्रावर सर्व बीएलओ हे उपस्थित राहून मतदार नाव नोंदणीचे कामकाज करणार आहेत.

यासाठी जिल्ह्यातील नवीन मतदारांनी या विशेष मोहिमेच्या तारखेदिवशी आपले नाव मतदार यादीत आवश्‍यक कागदपत्रासह संबंधित बीएलओ यांच्याकडे दाखल करुन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. नवीन नाव दाखल करण्यासाठी नमुना नं. 6, कमी करण्यासाठी नमुना नं.7, मतदार यादीतील तपशील दुरुस्तीसाठी नमुना नं.8 व स्थलांतराकरीता नमुना 8अ असून त्याकरीता एक रंगीत फोटो, रहिवाशी पुरावा, वयाचा पुरावा आवश्‍यक असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी पूनम मेहता यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थामधील अध्यक्ष/सचिव यांची मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून निवडणूक आयोगाकडून नेमणूक करण्यात आली असून या मोहिमेमध्ये कामकाज करीत आहेत. त्यांच्यामार्फत हौसिंग सोसायटीमधील नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करुन घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)