विशेष पथकाद्वारे पुण्यातील अवैध धंद्यावर कारवाई

पुणे, दि.7 – पुणे शहरात विविध ठिकाणी छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जरब बसविण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेमार्फत सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे आणि सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सट्टा, मटका, जुगार, हुक्का पार्लर, अवैध पार्टी सुरू असतील त्याबाबतची माहिती पोलिसांना कळविल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपआयुक्त ज्योतीप्रिया सिंग यांनी दिली आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे चालणाऱ्या हुक्का पार्लर आणि हुक्का पिणाऱ्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने, सोमवारी रात्री आठ ते मध्यरात्री दोन वाजणाऱ्या दरम्यान, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे विभागातील गुन्हे, आर्थिक आणि सायबर तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. कोंढवा, मुंढवा, कोरेगावपार्क, डेक्कन, हिंजवडी या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्निवल, शिशा, मल्ली बु कॅफे, होली स्मोक, हुक मी-अप, कॅस्नोव्हा, द व्हिलेज याठिकाणी संबंधित पथकाने कारवाई करून हुक्का विकणारे सात हॉटेल्स तसेच 55 हुक्का पिणाऱ्यांवर कोप्टा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. संबंधित व्यक्तींची माहिती महापालिका व शॉप ऍक्‍ट कार्यालयाला सांगून त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहे. यापुढे देखील अशाप्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)