“विशुद्ध, अभिजात योगशास्त्राचे जतन करणे भारतापुढील आव्हान’

पुणे – योगाचा प्रसार जगभरात वेगाने होत असताना विशुद्ध व अभिजात योगशास्त्राचे जतन करणे हे भारतापुढील मोठे आव्हान आहे, असे योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी येथे सांगितले.
केंद्रिय आयुष मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांच्या निवासस्थानी नाईक व डॉ. संप्रसाद विनोद यांची भेट झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, योगसाधक सुधीर बापट, डॉ.जगदीश करमळकर उपस्थित होते.
योगशास्त्राचा जगभर प्रसार होत असताना त्यातील अभिजातता टिकून राहणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियोजनबद्ध अशा प्रयत्नांची गरज आहे. हे अत्यंत मुलभूत आणि सुक्ष्म स्वरुपाच काम असून योगशास्त्रातील अभिजातता जतन करण्यासाठी महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. भगवान पतंजलीद्वारे पाच हजार वर्षापुर्वी अतिशय सुत्रबद्ध पद्धतीने हे योगशास्त्र लिहले गेले आहे. त्याचा अर्थ नीट समजून घेऊन ते आजच्या काळात आपल्या दैनंदिन जीवनात कसा लागू होतो, याबाबत ही या भेटीत चर्चा झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)