विशाल सोलंकी नवे शिक्षण आयुक्‍त

 

डॉ. विपीन शर्मा यांची “महाऊर्जा’मध्ये बदली

प्रभात वृत्तसेवा
पुणे- राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्‍तपदी वर्षही पूर्ण न झालेल्या डॉ. विपीन शर्मा यांची राज्य शासनाकडून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आसाम केडरचे विशाल सोलंकी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सोलंकी हे पुण्यातील सासवड येथील असून, ते आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम पाहिले आहे.
डॉ. विपीन शर्मा यांची मागील मेमध्ये शालेय शिक्षण विभागात शिक्षण आयुक्‍तपदी नियुक्‍ती झाली होती. शर्मा यांना एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदल करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्‍त पदाला पूर्णवेळ अधिकारी न मिळाल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराला गती मिळत नसल्याची खंत शिक्षण क्षेत्रातून होत आहे. शर्मा यांची बदली पुण्यातच “महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण'(महाऊर्जा) महासंचालक या पदावर झाली आहे. या नियुक्‍तीचे आदेश अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी जारी केले आहे.

अवघ्या 21 व्या वर्षी यूपीएससी टॉपर
विशाल सोलंकी यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत टॉपर ठरले होते. वयाच्या 34 व्या वर्षीच त्यांनी आसाम मुख्यमंत्र्यांच्या सचिव पदापर्यंत मजल मारली आहे. पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असलेले सोलंकी हे शिक्षण आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)