विशाल, कुमार, साद, अरुण, जवाहर, विशाल दुसऱ्या फेरीत

दुसरी पीवायसी-ग्रीन बेझ खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – विशाल कदम, कुमार शिंदे, साद सय्यद, अरुण बर्वे, जवाहर मानकर व विशाल उपशाम यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या राजाभाऊ शहाडे करंडक पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. पीवायसी हिंदू जिमखानातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पीवायसीचा मार्कर असलेल्या विशाल कदम याने संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली. विशालने चिपळूणच्या दीपक धनवानी याचा 48-51, 63(35)-28, 35-45, 63-16, 62-28 असा पराभव केला. आपल्या विजयात विशालने 35 गुणांचा ब्रेकही नोंदविला. पूना क्‍लबच्या कुमार शिंदे याने नाशिकच्या पंकज खत्री याचा 58-67, 48-42, 69-35, 64-50 असा पराभव केला.

डेक्‍कन जिमखानाच्या जवाहर मानकर याने पूना क्‍लबच्या चेतन शेलार याचा 30-54, 58-15, 65-18, 53-04 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. एलफिस्टनच्या विशाल उपशाम याने एपीजच्या अमर राईकर याचा 46-36, 47-57, 64-29, 59-02 असा पराभव करून आगेकूच केली.

पीवायसीच्या अरुण बर्वे याने चिपळूणच्या सिद्धेश मुळे याचा 33-51, 53-41, 49-24, 60-17 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. कॉर्नर पॉकेटच्या साद सय्यद याने मुंबईच्या सुमित सादुलकर याचा 61-32, 52-42, 30-58, 63-02 असा पराभव करून आगेकूच केली. तर पीवायसीच्या निमिष कुलकर्णीने पूना क्‍लबच्या अंगद सहानीचे आव्हान 65-36, 64-24, 73-31 असे मोडून काढले. त्याचप्रमाणे विशाल पांचाळ, अभिजीत रानडे, अदनान शेख, संकेत मुथा व रोहन कोठारे यांनीही विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल –
मुख्य ड्रॉ – पहिली फेरी – विशाल पांचाळ (न्यू क्‍लब) वि.वि. अर्पित शहा (मुंबई) 59-47, 59-54, 53-17; विशाल कदम (पीवायसी) वि.वि. दीपक धनवानी (चिपळूण) 48-51, 63(35)-28, 35-45, 63-16, 62-28; अभिजीत रानडे (नाशिक) वि.वि. ऍलेन इंगळे (वाकड) 68-09, 66-05, 76-44; निमिष कुलकर्णी (पीवायसी) वि.वि. अंगद सहानी (पूना क्‍लब) 65-36, 64-24, 73-31; अदनान शेख (चिपळूण) वि.वि. अशोक शेट्टी (पीवायसी) 64-08, 24-50, 58-21, 56-27;

कुमार शिंदे (पूना क्‍लब) वि.वि. पंकज खत्री (नाशिक) 58-67, 48-42, 69-35, 64-50; जवाहर मानकर (डेक्‍कन जिमखाना) वि.वि. चेतन शेलार (पूना क्‍लब) 30-54, 58-15, 65-18, 53-04; विशाल उपशाम (एलफिस्टन) वि.वि. अमर राईकर (एपीज्‌) 46-36, 47-57, 64-29, 59-02; अरुण बर्वे (पीवायसी) वि.वि. सिद्धेश मुळे (चिपळूण) 33-51, 53-41, 49-24, 60-17; साद सय्यद (कॉर्नर पॉकेट) वि.वि. सुमित सादुलकर (मुंबई) 61-32, 52-42, 30-58, 63-02; संकेत मुथा (कॉर्नर पॉकेट) वि.वि. सुनील चौधरी (न्यू क्‍लब) 65-16, 54-55, 72-29, 55-54; रोहन कोठारे (औरंगाबाद) वि.वि. राज शेटे (पनवेल) 51-44, 60-05, 73-29.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)