विवेकानंद व जिजाऊंचे कर्तृत्व आचरणात आणा -जयप्रकाश सातव पाटील

वाघोली- समाजात जातीधर्मामध्ये वाढत चाललेली दरी दूर करण्यासाठी व कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी युवकांनी विवेकानंदांची विद्वत्ता व जिजाऊंचे कर्तृत्वांचे आचरण करावे, असे मत वाघोली ग्रामपंचायतीचे सदस्य जयप्रकाश सातव पाटील यांनी व्यक्त केले. कटकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विठाई प्रतिष्ठान आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. कैलास पवार, शिवानी सातव मुख्याध्यापीका तापकीर उपस्थित होते. यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्वेता होनमाणे, द्वितीय क्रमांक वैभव कोंडुलकर, तृतीय क्रमांक तनुजा ठोकळ यांनी पटकविला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी शिक्षिका आशा कटके, गीता लोकमनवर, पालक उपस्थित होते. प्रा. कैलास पवार यांनी प्रास्ताविक तर मुख्याध्यापिका तापकीर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)