विवेकवादाची घुसमट आणखी किती दिवस चालणार..?- सुप्रिया सुळे

पुणे: अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 20 ऑगस्ट रोजी 5 वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, डॉ. दाभोलकरांचा विवेकवादाचा त्यांचा वारसा पुढे चालविण्याची आज गरज आहे. आपण सर्वजण हा विचार पुढे नेऊ, हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे ज्येष्ठ लेखक रा. ग. जाधव यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानातून मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. बालगंधर्व रंगमंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवरुन ते शनिवार पेठेतील निवासस्थानाकडे परतत होते. ते पुलाच्या मध्यभागी आले असतानाच मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर पिस्तूलातून लागोपाठ चार गोळ्या झाडल्या होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे झाली. आंदोलन तीव्र होताना दिसताच आता एक आरोपी पकडलाय. त्याच्या आधारे तरी तपास पूर्ण होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यामागील खऱ्या सुत्रधारांपर्यंत तपासयंत्रणा पोहचली पाहिजे. विवेकवादाची ही घुसमट आणखी किती दिवस चालणार..? ”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)