विविध संघटनांची संवेदना जागृती रॅली

चिंचवड - रॅलीतील शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांना निवेदन दिले.

पिंपरी – घट स्थापनेच्या दिवशी आपण नव्याने अंकुरीत झालेल्या सृष्टीची पूजा करत असतो. अशा नव्याने अंकुरणाऱ्या सृष्टेचे पूजक असलेल्या कोवळ्या कळ्यांना आपण कसे कुस्करू शकतो, हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. आपण ज्या संस्कृतीचे गोडवे गातो ती अशी अत्याचारी नाही. हा संदेश देण्यासाठी शहरातील विविध संघटनांच्या वतीने बुधवारी (दि. 10) संवेदना जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी व लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ या रॅलीचे आयोजन केले होते. माझे शहर, माझा अभिमान या अभियानामार्फत ही रॅली काढण्यात आली. यावेळी विविध संघटनांच्या वतीने पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांना निवेदन देण्यात आले.

-Ads-

रॅलीचे नेतृत्व अरुण कांबळे यांनी केले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, माजी सहाय्यक आयुक्त ऍड. सुभाष माचुत्रे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, सिटीझन फोरमचे हृषिकेश तपशाळकर, लायन्स क्‍लबचे अनिल झोपे, मेघल स्पेस प्रा. लि. चे संचालक तुषार शिंदे, बापूसाहेब गोरे, गणेश हुंबे, ऍड. बाळकृष्ण रणपीसे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष आनंदा कुदळे, बारा बलुतेदार संघटनेचे शहराध्यक्ष प्रताप गुरव, डॉ. गणेश अंबिके, डॉ. सरोज अंबिके आदी रॅलीत सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)