विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभर दौरा

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 10 – समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोहचातात का, विकासकामांसाठी दिलेला निधी किती खर्च झाला, कामे किती पूर्ण झाली तसेच अडचणी किंवा समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाभर दौरा करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (पुर्वीचे नाव दलितवस्ती सुधार योजना) या योजनेअंतर्गत दरवर्षी अनेक कामांना मंजूरी दिली जाते. दिलेल्या मंजूरीप्रमाणे कामे होतात किंवा नाही, तसेच ही कामे गावपातळीवर करीत असताना स्थानिक पातळीवर काही अडचणी येतात का याबाबतची माहिती घेण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जो आराखडा तयार केलेला आहे, त्याची माहिती घेण्यात येणार असून, सर्व पंचायत समिती स्तरावर बैठक आयोजित करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या दौऱ्याला दौंड पंचायत समितीपासून सुरवात करणार असून, बैठकीला तालुक्‍यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच सर्व ग्रामसेवकांना निमंत्रित करण्यात येणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)