विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय बंजारा क्रांतिदलाचे मुंबईत उपोषण

पुणे – केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे अल्पसंख्याक समाजाविरोधात काम करत आहे. त्यामुळे या सरकारविरोधात बंजारा,भटके विमुक्त, बारा बलुतेदार ओबीसी समाजाच्यावतीने 5 जानेवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय बंजारा क्रांतिदल पश्‍चिम महाराष्ट्राच्यावतीने या उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ओबीसी, मराठा, कुणबीसह सर्वांची जातीनिहाय जनगणना करा, मराठा समाजासाठी सुरू केलेली “सारथी’ योजना ओबीसी-भटक्‍या विमुक्तांनाही लागू करा, मागासवर्गीयांचे बढती आरक्षण सुरू करा या तसेच इतर अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या उपोषणाच्या आंदोलनात ऑल इंडिया बंजारा संघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल यांच्यासह बारा संघटना सहभागी होणार आहेत. आंदोलनासंदर्भात अधिक माहिती देताना मूर्ती राठोड म्हणाले, “विद्यार्थी, नोकरदार, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, शेतकरी-शेतमजूर, निराधार, निराश्रित महिलांचे हक्क हे सरकार डावलत आहे. त्याचबरोबर ओबीसीतील निरनिराळ्या समाजाच्या अनेक मागण्या आहेत.यामागण्या शासनाने पूर्ण कराव्यात, अशी मागणी या उपोषणात करण्यात येणार आहे. हे उपोषण आझाद मैदान येथे होणार आहे. या उपोषणात पश्‍चिम महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)