विविध मागण्यांसाठी प्राध्यापक संपावर

पिंपरी – शिक्षक भरती लवकरात-लवकर करावी, समान काम समान वेतन या तत्त्वावर तटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करावी, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना नियमित करावे, सातव्या वेतन आयोगाची त्वरीत अंमलबजावणी करावी, या मुख्य मागण्यांसाठी राज्यभरातील प्राध्यापकांनी संप पुकारला आहे.

प्राध्यापकांच्या मागणीसाठी स्पुक्‍टो संघटनेतर्फे पुकारलेल्या संपात राज्यभरातील पंचवीस हजार प्राध्यापक सहभागी झाले आहेत. यामध्ये, पिंपरी-चिंचवड शहरात चार ते पाच महाविद्यालयातील दोनशे प्राध्यापक सहभागी झाले आहेत. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील तीस प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. सकाळी साडेसात ते दुपारी दोन वाजेपर्यत महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थानिक स्पुक्‍टो शाखेचे अध्यक्ष प्रा. सुनील सालके म्हणाले, राज्यातील प्राध्यापक भरती 2014 सालापासून बंद केली आहे. तसेच, कित्येक निवृत्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. महाविद्यालयात तटपुंज्या मानधनावर शिक्षक नेमण्यात येत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत आहेत. तसेच, गेल्या पाच वर्षपासून शिक्षक भरती बंद केल्याने विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. राज्यभरात गेल्या काही महिन्यात जेल भरो आंदोलन, एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. मात्र, राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नसून केवळ आश्‍वासन देत आहे. प्राध्यापकांचे 71 दिवसांचे थकीत वेतन दिले नाही. तसेच, प्राध्यापकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र लवाद नेमण्याची आवश्‍यकता आहे. याचबरोबर, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन प्राध्यापकांना न्याय दिला पाहिजे. राज्यभरातील प्राध्यापकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना यापूर्वीच निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

लेखी आश्‍वासनानंतरच संप मागे
राज्यातील प्राध्यापकांच्या एम स्पुक्‍टो संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण संचालकांसोबत मंगळवारी बैठक आयोजित केली होती. यामध्ये, प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत लवकरात-लवकर तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, प्राध्यापकांनी मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची, भूमिका प्राध्यापकांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)