विविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन

मान्यवरांची भावना : पुलोत्सवांतर्गत म.सा.प.मध्ये रंगला परिसंवाद

पुणे – चित्रपट आणि नाटकातील अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गायक अशा विविध भूमिकांमधून पु. ल. देशपांडे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाले. एकाचवेळी आपल्या विविध कौशल्यातून व्यक्त होणाऱ्या पुलंनी नाटक आणि चित्रपट या माध्यमातूनही रसिकांना भुरळ घातली, अशी भावना मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली.

“पु. ल. परिवार’ आणि “आशय सांस्कृतिक’, “स्क्वेअर 1′ आयोजित पुलोत्सवांतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषदेत “चित्रपट नाटकातील पु. ल.’ या परिसंवादात माधव वझे, आनंद माडगूळकर, आणि किरण यज्ञोपवित सहभागी झाले होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

“समजून घेणारे, वेवलेन्थ जुळणारे सहकारी असतील, तर काम चांगले होते. पुलंचा अभिनय हा कधीच अंगावर यायचा नाही. पात्राशी एकरुप झाल्यावर अभिनय नैसर्गिक होतो यावर पुलंचा विश्वास होता. मराठी चित्रपटसृष्टीत मानधन मिळण्याबाबत होणाऱ्या विलंबामुळे पुलं फार काळ रुळले नाहीत. पुल किंवा गदिमा मंडळींचे कधी स्वतःचे मानधन मागण्याचे धाडस झाले नाही. पैसे बुडविणे हे प्रकार त्याही काळातही होते. ही वृत्ती म्हणजे चित्रपट सृष्टीला लाभलेला शाप आहे. अनेकदा गुणवान कलाकारांना देखील चित्रपट सृष्टीतील अनिश्‍चितीमुळे नको ते काम स्विकारावे लागते आणि ते करावे लागते,’ असे आनंद माडगुळकर म्हणाले.

यज्ञोपवित म्हणाले, “सबकुछ पुल’ या तत्वाने सर्वच निर्मितीशी संबंधित जबाबदाऱ्या पुलंनी पार पाडल्याने पुल चाहत्यांना “वंदे मातरम्‌’सारख्या चित्रपटांचा आस्वाद घेता आला.’

“1948 ते 1952 याकाळात पुलंनी काढलेले 19 चित्रपट “हिट’ झाले. लेखकाच्या दृष्टीस योग्य दिग्दर्शक मिळाला नाही, तर त्या कलाकृतीची माती होते, असा पुलंचा अनुभव होता. “तीन पैशांचा तमाशा’ बाबतीत पुलंना हाच अनुभव आला. पुलंना तमाशाच्या अंगाने जाणारे नाटक अपेक्षित होते. मात्र, ते नाटकाची रंगीत तालिम पाहिला गेले असता नंदू भेंडे, भास्कर चंदावरकर आणि आनंद मोडक या तिघांवर असलेला पाश्‍चिमात्य संगीताच्या प्रभावामुळे त्या नाटकावर त्या संगीताचा प्रभाव पडला. त्यावेळी या पाश्‍चात्य संगीताच्या प्रभावापोटी त्या नाटकाला लाभलेले कर्कश संगीतामुळे कानात कापसाचे बोळे घालून घ्यावेत, अशी प्रतिक्रिया पुलंनी वसंतराव देशपांडे यांच्याकडे दिली होती,’ असे माधव वझे म्हणाले.
मसापचे मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)