विविध पक्षांकडून खासदार आढळरावांचा सत्कार

  • मंचर पाणी योजना मंजूर केल्याबद्दल लांडेवाढी येथे कार्यक्रम

मंचर – मंचर शहरासाठी 13 कोटी 72 लाख रकमेचा पाणी प्रकल्प मंजूर केल्याबद्दल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मंचर गावच्या वतीने तालुक्‍यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आज (दि. 13) लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे जाहीर सत्कार केला.
यावेळी सत्कार समारंभास उपस्थित तालुक्‍यातील विविध नेत्यांनी मनोगत व्यक्‍त केले. स्व. लोकनेते किसनराव बाणखेले, माजी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील यांनी मंचरला चांगली नळपाणी योजना व्हावी यासाठी खासदार आढळराव पाटील यांनी जातीने लक्ष घालून ही योजना साकारण्यासाठी प्रयत्न करावे याकरिता मागणी केली होती. खासदार आढळराव पाटील यांनी किसनराव बाणखेले यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करून दाखवेन, अशी ग्वाही दिली होती. तेंव्हापासून आजपर्यंत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही योजना व्हावी यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. वेळोवेळी गावच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आभार मानले. तसेच आंबेगाव तालुका व मंचर गावच्या वतीने खास पुणेरी पगडी, हार व तलवार भेट देऊन खासदार आढळराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या योजनेसाठी स्वत:ची जमीन मंचर ग्रामपंचायतीस विनामोबदला देणारे सोपानराव थोरात व सोमनाथ भेके यांचा सन्मान खासदार आढळराव पाटील यांनी केला. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, भाजप तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष राजू इनामदार, सरपंच दत्ता गांजाळे, माजी सरपंच मिरा बाणखेले, उपसरपंच महेश थोरात, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष वसंत बाणखेले, शिवसेना सल्लागार सुरेश भोर, ग्रा.पं.सदस्य कैलास बाणखेले, अरूण बाणखेले, धनेश मोरडे, सविता क्षीरसागर, संगिता बाणखेले, सुप्रिया राजगुरव, सविता खरमाळे, शिवउद्योग सेना तालुकाध्यक्ष सागर काजळे, युवासेना उपजिल्हाधिकारी कल्पेश बाणखेले, भाजपा युवामोर्चा उपाध्यक्ष संदीप बाणखेले, तालुकाध्यक्ष प्रमोद बाणखेले, सुशांत थोरात, शिवाजी राजगुरू, योगेश बाणखेले, शहरप्रमुख संदीप जुन्नरे, सुरेश घुले, रंगनाथ थोरात, डॉ. विजय वळसे, संजय गांधी निराधार समितीचे कैलास राजगुरव, सुशांत जाधव, गणेश बाणखेले आदी मान्यवर व मंचरचे ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

  • विनामोबदला दिली जमिन
    ही योजना मार्गी लावताना ग्रामपंचायतीला काही ठिकाणी जागेची आवश्‍यकता निर्माण झाली. त्यासाठी सोपानराव थोरात व सोमनाथ भेके यांनी गावच्या हितासाठी विनामोबदला जागा दिली. खऱ्या अर्थाने ही योजना पूर्ण करण्यामध्ये खासदार आढळराव पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे विरोधकांनी याचे श्रेय न घेता खासदार आढळराव पाटील यांनी मंचर शहरासाठी मंजूर करून आणलेल्या सर्वात मोठ्या पाणी योजनेचे मोठ्या मनाने स्वागत करावे, असे आवाहन यावेळी आंबेगाव तालुक्‍यातील शिवसेना, भाजपा व कॉंग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)