विविध देशांच्या व्यापार निर्बंधांमुळे जागतिक अर्थकारणाला धोका

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षांनी दिला इशारा
जिनीव्हा – जगातले अनेक देश आंतरराष्ट्रीय व्यापाराला मनमानी पद्धतीने कर आकारणी करून अडथळे आणीत आहेत. त्यांची ही भूमिका मुक्त व्यापारासाठी अनुकुल नसून त्यांच्या या भूमिकेमुळे जागतिक अर्थकारणाला मोठा धोक निर्माण होऊ शकतो असा इशारा जागतिक व्यापार संघटनेचे अध्यक्ष रॉबर्टो अझेवेदो यांनी दिला आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या एकमेकांच्या व्यापार आयातनिर्यातीवर मोठ्या कुरघोड्या सुरू आहेत. कालच अमेरिकेन चीनच्या मालावर मोठ्या प्रमाणात आयात कर लागू केला आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. जागतिक व्यापार संघटना ही जगातील मुक्त व्यापाराला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे. पण विविध देशांच्या अशा धोरणामुळे ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेलाच बाधा येत असून त्यातून जागतिक अर्थकारण धोक्‍यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)